राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - ऑईल सीड्स (NMEO-OS) अंतर्गत मूल्य साखळी भागीदार
जालना, 13 जून (हिं.स.)। राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - ऑईल सीड्स (NMEO-OS) अंतर्गत मूल्य साखळी भागीदार (VCP) निवडीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबीया (NMEO-OS) सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यात तेलबिया पिकांच्या उत्पादन,
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - ऑईल सीड्स (NMEO-OS) अंतर्गत मूल्य साखळी भागीदार


जालना, 13 जून (हिं.स.)।

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - ऑईल सीड्स (NMEO-OS) अंतर्गत मूल्य साखळी भागीदार (VCP) निवडीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबीया (NMEO-OS) सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यात तेलबिया पिकांच्या उत्पादन, उत्पादकता, प्रक्रिया, मूल्यवर्धन व बाजारपेठ विकासास चालना देण्यासाठी मूल्य साखळी भागीदार (Value Chain Partner - VCP) यांची निवड करण्यात येणार आहे.

योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा कार्यकारी समितीमार्फत (DEC) मूल्य साखळी भागीदार निवडीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs), सहकारी संस्था तसेच पात्र सार्वजनिक व खाजगी संस्था यांनी विहित नमुन्यात दि. 17 जुन, 2026पर्यंत अर्ज सादर करावेत.

शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) / सहकारी संस्थांसाठी पात्रता निकष :

कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यानुसार नोंदणीकृत असणे आवश्यक.बंधित जिल्ह्यात किमान 3 वर्षे कार्यरत असणे आवश्यक. म्हणजेच नोंदणी माहे 2023 पुर्वीची किमान 200 शेतकरी सदस्य असणे आवश्यक.मागील 3 वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल किमान 9 लाख रुपयांपेक्षा जास्त असावी.तेलबिया पिकांमध्ये कामकाजाचा अनुभव असावा. FPO/FPC मध्ये शेतक-यांचा किमान 3 लाख रुपयांचा समभाग असावा.कमी उत्पादकता असलेल्या तालुक्यांमध्ये कार्यरत संस्थांना प्राधान्य देण्यात येईल.

सार्वजनिक / खाजगी संस्थांसाठी पात्रता निकष :किमान वार्षिक उलाढाल 10 कोटी रुपये असावी.मागील 3 वर्षांत कोणतीही कर थकबाकी अथवा कर चुकवेगिरीची नोंद नसावी.बियाणे, खते अथवा खाद्यतेल क्षेत्रात किमान 5 वर्षांचा अनुभव असावा.तेलबिया व खाद्यतेल क्षेत्रातील मूल्य साखळी विकासाचा अनुभव असावा.

निवड प्रक्रिया: प्राप्त अर्जाची जिल्हा कार्यकारी समितीमार्फत छाननी करून गुणांकन पद्धतीने निवड करण्यात येईल. कार्यरत वर्षे, सरासरी महसूल/उलाढाल, तेलबिया व खाद्यतेल क्षेत्रातील अनुभव, समूह विकासातील अनुभव तसेच शेतकरी व मूल्य साखळीतील समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता या बाबींवर गुणांकन केले जाईल.

इच्छुक संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना यांच्या कार्यालयात दि.17 जुन,2026 सादर करावेत.जिल्ह्यातील पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ब्रिहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गहिनीनाथ कापसे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande