
त्या पोलिसांविरोधात कारवाईची मागणी करणार
नाशिक, 13 जून (हिं.स.) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर एक नवा वाद उफाळून आला आहे. सिंहस्थ ध्वज शिलान्यास पूजन सोहळ्याच्या प्रसंगी पोलिसांनी महिला आखाड्याच्या प्रमुख साध्वी त्रिकाल भवंता यांना कार्यक्रमस्थळी जाण्यापासून रोखल्याचा आरोप त्रिकाल भवंता यांनी केला आहे.
याप्रकरणी आपण कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगुन भवता म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा महिला आखाड्याला जर विचारणार नसतील तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला त्रिकाल भवंता म्हणाल्या की, पोलिसांनी आपल्याला (घटनास्थळी जाऊ न देता बेकायदेशीरपणे स्थानबद्ध करून ठेवले. व्या प्रकारामुळे महिला आखाड्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात असून, आपल्याला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे निवेदन देऊन कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आज देशाच्या संसदेत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले जात आहे, सर्व क्षेत्रांत महिला नेतृत्व करत आहेत. असे असताना सनातन धर्माच्या आणि कुंभमेळ्याच्या सर्वोच्च धार्मिक कार्यात महिला आखाड्यांना पुरेसे नेतृत्व का दिले जात नाही ? महिला संतांना अशा प्रकारे धार्मिक कार्यात अडसर का निर्माण केला जात आहे असा सवाल साध्वी त्रिकाल भवंता यांनी केला आहे. दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये बोलताना साध्वी भवता म्हणाले की महिला आखाड्यांना कुंभमेळ्यामध्ये कोणतेही स्थान दिले जात नाही असे आत्तापर्यंत दिसून आलेले आहे जर आम्हाला काही महत्त्वाचं नसेल तर आम्ही या सिंहस्थ कुंभ परवा मध्ये सहभागी व्हावे की नाही असा प्रश्न पडला असून प्रशासन कोणतीही मदत करत नाही जाणून-बुजून सहकार्य होत नाही असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV