कोल्हापूर जिल्ह्यात सुरळीतरित्या पार पडली एमपीएसची परिक्षा
कोल्हापूर, 14 जून (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा - 2026 ही परीक्षा रविवार 14 जुन, रोजी सकाळी 11ते 12 या वेळेत कोल्हापूर जिल्हयात सुरळीतरित्या पार पडली.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरळीतरित्या पार पडली एमपीएसची परिक्षा


कोल्हापूर, 14 जून (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा - 2026 ही परीक्षा रविवार 14 जुन, रोजी सकाळी 11ते 12 या वेळेत कोल्हापूर जिल्हयात सुरळीतरित्या पार पडली. जिल्हातील कोपार्डे, सांगरूळ कुडीत्रे, कागल, इचलकरंजी, वाठार,वडगांव,अतिग्रे आदी ठिकाणासह कोल्हापूर शहरातील महाविद्यालये व हायस्कूल अशा 62 उपकेंद्रावर ही लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेकरीता जिल्ह्यात एकूण 18985 परिक्षार्थी बसले होते यापैकी 15735 विद्यार्थी उपस्थित तर 3250 विद्यार्थी अनुपस्थित होते .

जिल्ह्यात ही परीक्षा सुरळीतरित्या पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा कोल्हापूर जिल्हा केंद्र प्रमुख ,निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक,राज्यकर उपायुक्त जीएसटी भवन कोल्हापूर तथा विशेष निरीक्षक ,अभिरक्षक-1, अतिरिक्त अभिरक्षक-1, सहाय्यक अभिरक्षक-1 , परीक्षा नियंत्रक सहाय्यक-1 यांची प्रामुख्याने नियुक्ती करण्यात आली होती . तर परीक्षा कामकाजाकरीता 16 समन्वय अधिकारी ,921 समवेक्षक ,16 समन्वय सहाय्यक कर्मचारी ,133 लिपीक, 3 भरारी पथक अधिकारी, 62 केटरटेकर, 3 भरारी पथक सहाय्यक कर्मचारी, 502 शिपाई कर्मचारी , 62 उपकेंद्रप्रमुख , 15 जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, 277 पर्यवेक्षक आदी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते .

ही परिक्षा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . तसेच परिक्षा केंद्रावर प्रत्येक परिक्षार्थीचे बायोमेट्रीक पडताळणी व फ्रिस्किंग करण्यात आली . त्याचबरोबर कोल्हापूर शहरामधील 62 केंद्रांवरील प्रत्येक खोलीमध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात आले होते . या परिक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार अथवा अनियमितता घडली नसल्याची माहिती. निवासी उप जिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक गजानन गुरव यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande