
नवी दिल्ली, 14 जून (हिं.स.)बिहारमधील पाटणा येथील सुप्रसिद्ध शिक्षक रोशन आनंद सर आणि खान सर यांच्यातील सुरू असलेला वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या वादामुळे ज्ञानबिंदू कोचिंग सेंटरचे संचालक रोशन आनंद सध्या तुरुंगात आहेत. अनेक दिवसांपासून अटकेच्या धोक्याचा सामना केल्यानंतर खान सरांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या वादाच्या दरम्यान नेपाळमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्ञानबिंदू कोचिंग सेंटरचे संचालक रोशन आनंद यांचा भाऊ प्रिन्स याचा नेपाळमध्ये मृत्यू झाला आहे. खान सरांच्या कोचिंग सेंटरवरील हल्ल्यात प्रिन्सवर आरोप होता.
खान सरांच्या कोचिंग सेंटरवरील हल्ल्यात प्रिन्स हा देखील एक आरोपी होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर प्रिन्स आपल्या सहा-सात मित्रांसोबत नेपाळमध्ये राहत होता. काल रात्री उशिरा संशयास्पद परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रोशन आनंद सरांचे कुटुंब नेपाळमध्ये दाखल होत आहे. २०२१ मध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवरील हल्ल्यात प्रिन्सवरही आरोप होता.
नेपाळमधील एका हॉटेलमध्ये रोशन आनंद यांचा भाऊ प्रिन्स याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही. तपास सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या इतर तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे