
छत्रपती संभाजीनगर, 15 जून (हिं.स.)। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेणुका माता गड, सोमठाणा येथे भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री मा. श्रीमती पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते रेणुका मातेला महाआरती अर्पण करण्यात आली. देशाच्या प्रगतीसाठी, समृद्धीसाठी, सर्व नागरिकांच्या सुख-शांतीसाठी तसेच विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी प्रार्थना करण्यात आली.मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील सेवा, सुशासन, गरीब कल्याण, पायाभूत विकास, आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रहिताच्या विविध निर्णयांचा गौरव यावेळी करण्यात आला. जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद यांच्या बळावर भारत जागतिक स्तरावर अधिक सक्षम व प्रभावशाली बनत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा जिल्हा महासचिव प्रवीणजी घुगे, अनिल कोलते पाटील, बद्रीनाथ पठाडे, सतीश नागरे, वसंतराव जगताप, भगवान मात्रे, भगवान बारगाजे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रेणुका मातेच्या चरणी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, जनकल्याणासाठी आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis