
डोंबिवली, 15 जून (हिं.स.)
महावितरण कंपनीचे ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्या संदर्भात मेसेज पाठविले मात्र या मेसेज वरून जनतेत तीव्र विरोधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जरी लोकांतून विरोध झाला तरी काही दबाव टाकून हे मीटर बसविण्याच्या सरकारने निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर उत्तर म्हणून काही हाउसिंग सोसायट्यांनी कितीही दबाव आला तरी हे स्मार्ट मीटर बसवून घ्यायचे नाही. त्यांनी मीटर बॉक्स ग्रीलला मोठे कुलूप लावून ठेवले असून परिणामी कंपनी कर्मचाऱ्यांना मीटर बदलता येणार नाही.
तसेच याशिवाय हाउसिंग सोसायट्यांनी एक पत्र महावितरणला दिले असून त्यात हे स्मार्ट मीटर आमच्या इमारतीत बसवू नये अशी मागणी, विनंती केली आहे. हाउसिंग सोसायट्यांनी घेतल्याने महावितरणची आता गोची झाली असून काही राजकीय संघटनांकडून या स्मार्ट मीटर बसविण्याला जोरदार विरोध होत आहे. जर सर्वंच हाउसिंग सोसायट्यांनी हा प्रयोग केला तर महावितरणला स्मार्ट मीटर बसविणे मुश्किल होणार आहे.
येथील एमआयडीसी निवासी मधील महावितरण कार्यालयात स्मार्ट मीटर बसविणे आणि एकसारखा खंडित होणारा विज पुरवठा, लाईट बिल भरमसाठ येणे यासंदर्भात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. डोंबिवली शहर, 27 गावांमधील ग्रामस्थ यांनी येऊन आपल्या व्यथा या महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. जनतेत मोठा असंतोष निर्माण झाल्यामुळे महावितरण प्रशासन आणि सरकार आता काय निर्णय घेणार या प्रतिक्षेत वीजग्राहक आहेत.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi