
ह्यूस्टन, १५ जून (हिं.स.)फिफा विश्वचषक २०२६ च्या गट 'इ' मधील सामन्यात जर्मनीने दमदार कामगिरी करत, प्रथमच स्पर्धेत सहभागी झालेल्या कुराकाओ संघाचा ७-१ ने पराभव केला. ज्युलियन नागेल्समनच्या संघाने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेची शानदार सुरुवात केली.
जर्मनीसाठी काय हावर्ट्झने दोन गोल केले, तर फेलिक्स नमेचा, निको श्लॉटरबेक, जमाल मुसियाला, नॅथॅनियल ब्राउन आणि डेनिझ उंडाव यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाचा विजय निश्चित केला.जर्मनीने सामन्याची सुरुवात आक्रमकपणे केली. पण कुराकाओने काही काळ सामना रोमांचक ठेवला. सामन्याच्या २१ व्या मिनिटाला लिव्हानो कोमानेशियाने बरोबरी साधली आणि विश्वचषकाच्या इतिहासातील कुराकाओचा पहिला गोल नोंदवला.
मात्र, त्यानंतर जर्मनीने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. अचूक पासिंग, सातत्यपूर्ण आक्रमणे आणि उत्कृष्ट फिनिशिंगच्या जोरावर जर्मन संघाने क्युरासाओच्या बचावाला पूर्णपणे खिंडार पाडले.पहिल्या हाफनंतर जर्मनीने गोल करणे सुरूच ठेवले आणि दुसऱ्या हाफमध्येही आपले वर्चस्व कायम ठेवले. काय हावर्ट्झच्या दोन गोलांमध्ये इतर खेळाडूंनीही योगदान दिले. या मोठ्या विजयामुळे जर्मनीने 'ग्रुप ई' मध्ये दमदार सुरुवात करून आपला इरादा स्पष्ट केला आहे, तर कुराकाओला त्यांच्या पुढील सामन्यात पुनरागमन करण्याचे आव्हान पेलावे लागेल.
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे