महिला टी-२० विश्वचषक २०२६: भारताची पाकिस्तानवर ६४ धावांनी मात, दीप्ती शर्माला 5 विकेट्स
बर्मिंगहॅम , 15 जून (हिं.स.)भारतीय संघाने पाकिस्तानला ६४ धावांनी पराभूत करून महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये दमदार सुरुवात केली. बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, स्मृती मंधानाच्या ६८, हरमनप्रीत कौरच्या ३६ आणि रिचा घोषच्या ३४ धावांच्या
दीप्ती शर्मा

बर्मिंगहॅम , 15 जून (हिं.स.)भारतीय संघाने पाकिस्तानला ६४ धावांनी पराभूत करून महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये दमदार सुरुवात केली. बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, स्मृती मंधानाच्या ६८, हरमनप्रीत कौरच्या ३६ आणि रिचा घोषच्या ३४ धावांच्या जोरावर भारताने सहा गडी गमावून १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ १७ षटकांत १०६ धावांवर सर्वबाद झाला. दीप्ती शर्माने १० धावांत पाच बळी घेतले, तर श्री चरणीने तीन बळी मिळवले. महिला टी-२० विश्वचषकात धावांच्या बाबतीत पाकिस्तानवर भारताचा हा सर्वात मोठा विजय होता.

प्रथम फलंदाजी करताना, शफाली वर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून भारताला दमदार सुरुवात करून दिली, पण पुढील तीन चेंडूंवर तिला एकही धाव करता आली नाही आणि पाचव्या चेंडूवर ती बाद झाली. सादिया इक्बालने तिची विकेट घेतली. जेमिमा रॉड्रिग्सलाही संघर्ष करावा लागला आणि तिने सात चेंडूंमध्ये एक धाव काढली. अशा परिस्थितीत स्मृती आणि हरमनप्रीत कौर (३६) यांनी संघाला सावरले. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करून भारताला १०० धावांच्या पुढे नेले.

स्मृती मंधानाने ३४ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ४४ चेंडूंमध्ये ६८ धावा करून ती बाद झाली. शेवटच्या षटकात, रिचाने पाच चौकार आणि एका षटकारासह १७ चेंडूंमध्ये ३४ धावा ठोकून भारताला १७० धावांपर्यंत पोहोचवले. पाकिस्तानकडून सादिया इक्बाल आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करताना, शफाली वर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून भारताला दमदार सुरुवात करून दिली, पण पुढील तीन चेंडूंवर तिला एकही धाव करता आली नाही आणि पाचव्या चेंडूवर ती बाद झाली. सादिया इक्बालने तिची विकेट घेतली. जेमिमा रॉड्रिग्सलाही संघर्ष करावा लागला आणि तिने सात चेंडूंमध्ये एक धाव काढली. अशा परिस्थितीत स्मृती आणि हरमनप्रीत कौर (३६) यांनी संघाला सावरले. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करून भारताला १०० धावांच्या पुढे नेले.

पाकिस्तानची सलामीची जोडी मुनीबा अली (४१) आणि गुल फिरोजा (१२) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी ४.५ षटकांमध्ये वेगाने ३८ धावा जमवल्या. दीप्तीने फिरोजाला बाद करून ही भागीदारी तोडली. त्यानंतर तिने आयेशा जफरला (१२) बाद केले. सायरा जबीन (२), नतालिया परवेझ (७) आणि फातिमा सना (०) यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. मुनीबा ३५ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह ४१ धावा करून धावबाद झाली. यामुळे पाकिस्तानची धावसंख्या ७५/३ वरून ७९/६ अशी झाली. खालच्या फळीत फक्त आलिया रियाझला (१८) दुहेरी आकडा गाठता आला. दीप्तीने १० धावांत पाच बळी घेतले, तर चरणीने २१ धावांत तीन बळी घेतले. शेफाली वर्माला एक बळी मिळाला. पाकिस्तानचे फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. त्यांच्या १० पैकी नऊ बळी फिरकी गोलंदाजांनी घेतले, तर एक बळी धावबाद झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

 rajesh pande