ग्रंथपाल ज्ञानाचे संवाहक - वैद्य विक्रांत जाधव
नाशिक, 15 जून (हिं.स.)। - ग्रंथपाल हे केवळ पुस्तकांचे रक्षक नसून ज्ञानाचे संवाहक आणि समाजातील वाचन संस्कृतीचे संवर्धक आहेत असे प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांनी केले. सार्वजनिक वाचनालयात महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ
Librarian Conveyor of


नाशिक, 15 जून (हिं.स.)।

- ग्रंथपाल हे केवळ पुस्तकांचे रक्षक नसून ज्ञानाचे संवाहक आणि समाजातील वाचन संस्कृतीचे संवर्धक आहेत असे प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांनी केले. सार्वजनिक वाचनालयात महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाच्या सदिच्छा समारंभ प्रसंगी वैद्य जाधव बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.सुनील कुटे म्हणाले,परीक्षेची तयारी करताना विषयाचे सखोल आकलन, ग्रंथालयशास्त्रातील मूलभूत संकल्पना, वर्गीकरण, सूचीकरण, संदर्भ सेवा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

कार्याध्यक्ष संजय करंजकर यांनी सांगितले की,वाचन संस्कृती वाढविणे, वाचकांना योग्य माहिती उपलब्ध करून देणे आणि समाजाच्या बौद्धिक विकासात योगदान देणे ही ग्रंथपालांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे आवाहन केले.प्रारंभी ग्रंथालय शास्त्राचे जनक एस रंगनाथन व विद्या देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रशिक्षणार्थी सौ सायली डेरले यांनी मनोगत व्यक्त करून आपले अनुभव सांगितले. स्वागत व प्रास्ताविक प्रमुख सचिव गिरीश नातू यांनी केले. सदिच्छा समारंभासाठी वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, प्रा. डॉ.सुनील कुटे, कार्याध्यक्ष संजय करंजकर. अर्थसचिव प्रा सोमनाथ मुठाळ, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, नाट्यगृह सचिव डॉ. धर्माजी बोडके , स्वर सावना प्रमुख प्रशांत जुन्नरे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande