अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
रायगड, 15 जून (हिं.स.)। मुरुड तालुक्यातील टेंबुर्डे आदिवासीवाडी परिसरात अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात आरोपीविर
Minor girl lured with promise of marriage; case registered under POCSO.


रायगड, 15 जून (हिं.स.)।

मुरुड तालुक्यातील टेंबुर्डे आदिवासीवाडी परिसरात अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलगी असल्याचा गैरफायदा घेत तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नोव्हेंबर 2025 पासून वारंवार अत्याचार झाल्याने पीडिता गरोदर राहिल्याचे तपासात समोर आले आहे.

या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 86/2026 नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम 2012 चे कलम 4, 5(j)(2), 6 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(d), 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद मडावी करीत आहेत. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन पोलिस

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande