
बीड, 19 जून (हिं.स.)।
गेवराई तालुक्यातील मौजे ब्रह्मगाव येथील श्री हनुमान मंदिर परिसरात गोमांस फेकून देऊन विटंबना करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून उचित अशी कारवाई होत नसल्याच्या कारणास्तव भीमाशंकर यादव पाटील हे आमरण उपोषणास बसले .
उपोषण स्थळी भाजपनेच्या सारिका क्षीरसागर यांनी स्वतः जाऊन भेट देत त्यांच्याशी विचारणा केली.व त्यानंतर तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली.व यानंतर लगेचच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शितलकुमार बल्लाळ यांनी यासाठी येऊन पुढाकार घेतला.
यानंत सर्वांच्या यशस्वी मध्यस्थीने यादव पाटील यांना घेऊन थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन प्रभारी पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांची व याबाबतीत तपास करत असलेल्या अधिकारी वर्गांशी चर्चा केली व आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर यशस्वी चर्चा करून हे उपोषण उपोषण स्थळी सोडण्यात आले.परंतु अशा प्रकारच्या घटना या गांभीर्याने घेण्यासारखे असून आम्ही देखील गृह मंत्रालयापर्यंत याबाबतीत आवाज उठवणार आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis