बीड - माकेगाव येथील श्री दत्त मंदिरासमोरील नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन
बीड, 19 जून, (हिं.स.)। माकेगाव येथील श्री दत्त मंदिरासमोरील नदीवर सुमारे ₹५० लक्ष निधीतून उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे आमदार नमिता मुंदडा यांनी केले. हा पूल पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ
अ


बीड, 19 जून, (हिं.स.)। माकेगाव येथील श्री दत्त मंदिरासमोरील नदीवर सुमारे ₹५० लक्ष निधीतून उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे आमदार नमिता मुंदडा यांनी केले. हा पूल पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होण्यास मोठी मदत होणार आहे.

या प्रसंगी उपस्थित नागरिक, पदाधिकारी व ग्रामस्थांशी आमदार नमिता मुंदडा यांनी संवाद साधून परिसराच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande