लोहा शहरात 1 लाख 51 हजार वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ
नांदेड, 19 जून (हिं.स.) :राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त (22 जुलै) लोहा शहरात ‘1 लक्ष 51 हजार वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम’ हाती घेण्यात आली आहे.या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या
Q


नांदेड, 19 जून (हिं.स.) :राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त (22 जुलै) लोहा शहरात ‘1 लक्ष 51 हजार वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम’ हाती घेण्यात आली आहे.या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

लोहा शहर स्वच्छ आणि हरित बनविण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या टीमने हा उपक्रम सुरू केला आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जात आहे.या कार्यक्रमास युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, सचिन पाटील चिखलीकर तसेच अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन “हरित लोहा” संकल्प साकार करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande