कोल्हापुरात शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनाचा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात उत्सव साजरा
कोल्हापूर, 19 जून (हिं.स.) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोल्हापूर शहरात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 19 जून 1966 रोजी मुंबईत सुरू झालेल्या
कोल्हापूरात शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा


कोल्हापूर, 19 जून (हिं.स.) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोल्हापूर शहरात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 19 जून 1966 रोजी मुंबईत सुरू झालेल्या शिवसेनेच्या स्थापनेचा ऐतिहासिक प्रवास यानिमित्ताने स्मरणात ठेवण्यात आला.

या प्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा जपत जनसेवा, विकास आणि हिंदुत्वाच्या विचारांशी बांधिलकी कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नागरिकांच्या हितासाठी काम करत असून पक्ष अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्धापन दिनानिमित्त शहरात ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. भगव्या झेंड्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी नागरिकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.

शिवसेनेच्या 60 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आनंद साजरा करत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. या सोहळ्यात उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत उत्साह व्यक्त केला. संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

या कार्यक्रमास शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande