
रत्नागिरी, 19 जून (हिं.स.) । शिवसेनेचा साठावा वर्धापनदिन आज रत्नागिरीत उबाठा शिवसेनेतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त उबाठा शिवसेना शाखा साळवी स्टॉप येथे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून शिवसेना सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले होते.
रत्नागिरी तालुक्यातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी पक्षाच्या पुढील वाटचालीस आणि संघटन मजबुतीसाठी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प केला.
यावेळी रत्नागिरी तालुका समन्वयक शेखर घोसाळे, रत्नागिरी तालुकाप्रमुख मयूरेश्वर पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, विभागप्रमुख किरण तोडणकर, महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोदड, महिला तालुका संघटक ममता जोशी, महिला शहर संघटक सेजल बोराटे, सौ. मिताली पवार, गंधाली मयेकर, रेश्मा कोळंबेकर, रूपाली तवसाळकर, स्मिता काटकर, रंजना ठेपसे, सलिना डाफळे, प्रतिमा साळुंखे, प्रियांका सावंत, विभागप्रमुख संदेश भिसे, सिद्धराज सावंतदेसाई, युवा सेना तालुका अधिकारी संदेश नारगुडे, ओंकार कारेकर, सर्फराज शेख आदी शिवसैनिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी