रत्नागिरी : देवरूखच्या पेशवे उद्यानात लवकरच बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार
रत्नागिरी, 19 जून, (हिं.स.) । देवरूख येथील महाडीक स्टॉपनजीक मदन मोडक यांनी प्रतापसूर्य बाजीराव पेशवे उद्यानाची निर्मिती केली आहे. याच उद्यानात लढवय्या प्रतापसूर्य बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा लवकरच उभारला जाणार आहे असे मदन मोडक यांनी सांगितले
बाजीराव पेशवे यांचा पुतळा


रत्नागिरी, 19 जून, (हिं.स.) । देवरूख येथील महाडीक स्टॉपनजीक मदन मोडक यांनी प्रतापसूर्य बाजीराव पेशवे उद्यानाची निर्मिती केली आहे. याच उद्यानात लढवय्या प्रतापसूर्य बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा लवकरच उभारला जाणार आहे असे मदन मोडक यांनी सांगितले.

देवरूख शहरात मातृमंदिर समोर वामन मोडक उद्यानाची मदन मोडक यांनी उभारणी केली. त्यानंतर महाडीक स्टॉपनजीक प्रतापसूर्य बाजीराव पेशवे उद्यानाची उभारणी झाली. याच उद्यानात पेशवे यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या तसेच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणार्या पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे. हा पुतळा देवरूख येथे आणण्यात आला आहे.

पुतळा उभारणीसाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून अंतिम परवानगी लवकरच मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्याची माहिती श्री. मोडक यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या वेळी पुतळ्यासाठी मदत देणार्या संस्थेचे कुंदन साठ्ये व नगरकर सोबत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande