शिवदुर्गा : शिवसंवाद दौऱ्यासाठी बीडमधील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला आघाडीच्या बैठका
बीड, 19 जून (हिं.स.)। शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी ‘शिवदुर्गा - शिवसंवाद दौरा’ आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत केज,
शिवदुर्गा : शिवसंवाद दौऱ्यासाठी बीडमधील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला आघाडीच्या बैठका


बीड, 19 जून (हिं.स.)।

शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी ‘शिवदुर्गा - शिवसंवाद दौरा’ आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत केज, परळी, बीड आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला आघाडीच्या बैठका उत्साहात पार पडल्या.

यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक प्रभाग, गाव आणि शाखास्तरावर महिला पदाधिकाऱ्यांचे जाळे अधिक मजबूत करणे, नव्या महिला शाखाप्रमुखांची नियुक्ती करून संघटन विस्ताराला गती देणे, मतदारयादी पुनरिक्षण (SIR) प्रभावीपणे राबविणे, बूथनिहाय रचना बळकट करणे, जनसंपर्क वाढविणे तसेच आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर नियोजन करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. महिला आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे विचार अधिक व्यापकपणे तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्या समन्वयातून आयोजित या बैठकींना राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे, राष्ट्रीय सचिव शायना एन.सी., उपनेत्या विजया पोटे, संगीता ठोंबरे आणि कला शिंदे, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, संपर्कप्रमुख संगीताताई चव्हाण, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रकलाताई बांगर, कृषी उत्पन्न बाजार समिती सरोजनी दादासाहेब ससाणे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी, संपर्कप्रमुख, नगरसेवक, शाखाप्रमुख, लोकसभा व विधानसभा समन्वयक, स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande