चंद्रपूर : पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघ मृतावस्थेत आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट
चंद्रपूर, 20 जून (हिं.स.) : पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात शनिवारी सकाळी सुमारे 10.30 वाजता वाघ मृतावस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली. वनकर्मचाऱ्यांच्या नियमित गस्ती दरम्यान पिपरी दिक्षीत नियत क्षेत्रातील संरक्षित वनकक्ष क्रमांक 543 मधील तलाव परिसरात वाघा
चंद्रपूर : पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघ मृतावस्थेत आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट


चंद्रपूर, 20 जून (हिं.स.) : पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात शनिवारी सकाळी सुमारे 10.30 वाजता वाघ मृतावस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली. वनकर्मचाऱ्यांच्या नियमित गस्ती दरम्यान पिपरी दिक्षीत नियत क्षेत्रातील संरक्षित वनकक्ष क्रमांक 543 मधील तलाव परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच मध्य चांदा वनविभागातील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपासणीदरम्यान वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळून आले.

यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार, डॉ. नरसिंग तेलंगे आणि डॉ. यशोदिप कांबळे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर नियमानुसार मृत वाघाचे दहन करण्यात आले.

मात्र, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande