आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी - नीट, जेईई आणि सीईटीच्या मोफत तयारीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नंदुरबार, 25 जून (हिं.स.) आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी - नीट, जेईई आणि सीईटीच्या मोफत तयारीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


नंदुरबार, 25 जून (हिं.स.) आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आयआयटी (IIT) मधील उच्च अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे सहज शक्य व्हावे, यासाठी नामांकित खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्याने दोन वर्षांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास मंजुरी मिळाली आहे.

सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात नीट (NEET), जेईई (JEE) आणि सीईटी (CET) या परीक्षांच्या तयारीसाठी इयत्ता 11 वीत प्रवेश देण्यासाठी निवडक केंद्रांवर मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून, इच्छुकांनी 2 जुलै 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे

प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेली केंद्रे आणि विद्यार्थी संख्या:

नाशिक (मुढेगांव/बोपेगांव, नाशिक प्रकल्प) - 50 मुले (CET/JEE) आणि 50 मुले (NEET)

ठाणे (एकलव्य शेडेगांव, शहापूर प्रकल्प) - 50 मुली (CET/JEE) आणि 50 मुली (NEET)

अमरावती (शासकीय आश्रमशाळा चिंचघाट, पांढरकवडा प्रकल्प) - 50 मुले (CET/JEE) आणि

50 मुले (NEET)

नागपूर (शासकीय आश्रमशाळा सिंधीविहीर, वर्धा प्रकल्प) - 50 मुली (CET/JEE) आणि 50

मुली (NEET)

विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण पात्रता व अटी:

विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

विद्यार्थी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असावा आणि प्रवेशाच्या वेळी जातीचा दाखला

सादर करणे बंधनकारक आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. आवेदन पत्रातील सर्व

माहिती अचूक व खरी असणे आवश्यक आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षात (मार्च 2026) इयत्ता 10 वी

उत्तीर्ण झालेला असावा.

सर्व शासकीय/अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, तसेच खाजगी व मान्यताप्राप्त

माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी मार्च 2026 च्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण

झाले आहेत आणि NEET, JEE किंवा CET ची तयारी करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी आपले आवेदन

पत्र (अर्ज) दिनांक 02 जुलै 2026 पर्यंत 'प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार'

येथील शिक्षण विभागात जमा करावे, असेही प्रकल्प अधिकारी डॉ. पवार यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande