
लातूर, 26 जून (हिं.स.) : आनंदवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात “माझं गाव आरोग्यसंपन्न गाव” या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात NCD (असंसर्गजन्य आजार) अंतर्गत नागरिकांची बीपी आणि शुगर तपासणी करण्यात आली.या शिबिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेतला. आरोग्य तपासणी दरम्यान रक्तदाब आणि मधुमेहाचे स्क्रिनिंग करून नागरिकांना आवश्यक आरोग्य मार्गदर्शनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच भागवत वंगे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ घुले, दिपक पवार (UD अधिपरीचारक), जिल्हा समन्वयक (राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम) माधुरी उटिकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सम्राट सोमवंशी (नागरी आरोग्य केंद्र), आरोग्य सेवक विकास पोपळगट, निखिल कांबळे, आशा सुपरवायझर मनिषा मुसळंबे तसेच आशा कार्यकर्त्या अनुसया साबदे यांची उपस्थिती होती.
आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान व्हावे आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती वाढावी, यासाठी असे उपक्रम नियमितपणे राबवले जात असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis