रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांच राष्ट्रीय मोहिमेसाठी निवड
रत्नागिरी, 25 जून (हिं.स.) । येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची क्विक हिल फाउंडेशनच्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेसाठी क्लब ऑफिसर्स म्हणून निवड करण्यात आली आहे. सायबर सुरक्षाविषयक जनजागृती, डिज
सायबर सुरक्षेसाठी विद्यार्थी


रत्नागिरी, 25 जून (हिं.स.) । येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची क्विक हिल फाउंडेशनच्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेसाठी क्लब ऑफिसर्स म्हणून निवड करण्यात आली आहे.

सायबर सुरक्षाविषयक जनजागृती, डिजिटल सुरक्षिततेचा प्रसार आणि विद्यार्थी नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आली आहे.

या क्लब ऑफिसर्समध्ये स्नेहा भिडे (प्रेसिडेंट), राज गुरव (मीडिया डायरेक्टर), आर्या मोहित (सेक्रेटरी) आणि आयुष सनगरे (ॲक्टिव्हिटी डायरेक्टर) यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी प्रा. केतन जोगळेकर (शिक्षक समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहून सायबर सुरक्षाविषयक विविध उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करतील.

चालू शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयाने क्विक हिल फाउंडेशनशी सामंजस्य करार (MoU) केला असून, या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद, प्रशिक्षण सत्रे आणि जनजागृती मोहिमाआयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणक शास्त्र व आयटी विभाग समन्वयक सौ. अनुजा घारपुरे तसेच संगणकशास्त्र विभागप्रमुख श्री. अमोल सहस्रबुद्धे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या निवडीबद्दल क्विक हिल फाउंडेशनने महाविद्यालयाच्या सक्रिय सहभागाचे आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे विशेष कौतुक केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी नव्याने निवड झालेल्या क्लब ऑफिसर्सचे अभिनंदन करून आगामी सायबर सुरक्षा अभियानासाठी शुभेच्छा दिल्या.

सायबर सुरक्षेच्या वाढत्या गरजेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातून राबविण्यात येणारे हे उपक्रम समाजामध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यास निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने या माध्यमातून सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात एक नवीन आणि प्रेरणादायी अध्याय सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande