मराठवाडा जनता विकास परिषद जिल्हा शाखा नांदेडचे २८ जूनला अधिवेशन
नांदेड, 25 जून (हिं.स.)। मराठवाडा जनता विकास परिषद जिल्हा शाखा नांदेडचे अधिवेशन दि. २८ जून रोजी आनंदधाम, सीताखंडी ता. भोकर येथे होणार आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील प्रलंबित विविध कामाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. मराठवाडा जनता विकास परिषद ही स्
मराठवाडा जनता विकास परिषद जिल्हा शाखा नांदेडचे २८ जूनला अधिवेशन


नांदेड, 25 जून (हिं.स.)।

मराठवाडा जनता विकास परिषद जिल्हा शाखा नांदेडचे अधिवेशन दि. २८ जून रोजी आनंदधाम, सीताखंडी ता. भोकर येथे होणार आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील प्रलंबित विविध कामाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे.

मराठवाडा जनता विकास परिषद ही स्वातंत्रोत्तर मराठवाडा विभागाच्या विकासासाठी लोकशाही मार्गाने लढा देणारी संघटना असून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासात या संघटनेचे योगदान महत्त्वाचे आहे. संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीने प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या जिल्ह्यातील विकास विषयक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिवेशनाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणाव्यात आणि शासनाकडे त्यासाठीचा पाठपुरावा करावा असा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नांदेड जिल्हा शाखेने २८ जून रोजी मराठवाडा जनता विकास परिषद जिल्हा शाखा नांदेडचे अधिवेशन

आनंदधाम, सीताखंडी तालुका भोकर येथे घेण्याचे योजले आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या या अधिवेशनासाठी मराठवाडा जनता विकास परिषद औरंगाबादचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, सचिव प्रा. अर्जुन जाधव, माजी अध्यक्ष व खा. डॉ. व्यंकटेश काबदे, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सी.ए. डॉ. प्रवीण पाटील, शंतनू डोईफोडे उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा होईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांच्या पदाधिकारी व सदस्यांनी अधिवेशनास उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार, उपाध्यक्ष भाऊराव मोरे, गोविंदराव पाटील सिंधीकर, सचिव संभाजी शिंदे आदींनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande