राज्यसभेच्या दहा नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ
नवी दिल्ली, २५ जून (हिं.स.) राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी राज्यसभेतील दहा नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये प्रवीण चक्रवर्ती, देबाशीष सामंतराय, सना सतीश बाबू, विज
राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, २५ जून (हिं.स.) राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी राज्यसभेतील दहा नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये प्रवीण चक्रवर्ती, देबाशीष सामंतराय, सना सतीश बाबू, विजय चिंताकायला, भाष्यम राम कृष्ण, लिंगमनेनी रमेश, राजेश परमानंद शुक्ला, वैद्यनाथ राम, परिमल नाथवाणी आणि ताई तागक यांचा समावेश आहे.

यापैकी पाच सदस्यांनी हिंदीमध्ये, एकाने इंग्रजीमध्ये, एकाने तमिळमध्ये आणि तिघांनी तेलगूमध्ये शपथ घेतली.

या सदस्यांपैकी चार आंध्र प्रदेशातील, दोन झारखंडमधील आणि प्रत्येकी एक तमिळनाडू, गुजरात, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा येथील आहेत.

कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्यसभेचे महासचिव पी.सी. मोदी, सभागृहाचे इतर सदस्य, मान्यवर आणि राज्यसभा सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande