वडिलांच्या निधनाचा धक्का असह्य, मुलाने केली आत्महत्या
परभणी, 26 जून (हिं.स.)। वडिलांच्या अपघाती निधनाच्या धक्क्यातून नैराश्यात गेलेल्या एका वकील पुत्राने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वडिलांच्या निधनाचा धक्का असह्य, मुलाने केली आत्महत्या


परभणी, 26 जून (हिं.स.)। वडिलांच्या अपघाती निधनाच्या धक्क्यातून नैराश्यात गेलेल्या एका वकील पुत्राने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवराज नागोराव अन्नपूर्णे (वय 43) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे अपघातात निधन झाले होते. या घटनेनंतर ते मानसिक तणाव आणि नैराश्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. याच नैराश्यातून गजानननगर येथील राहत्या घरी त्यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी मयताचे साडू बळीराम पतंगे यांनी दिलेल्या खबरीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गुरसुडकर करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande