जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तलवार व देशी दारू जप्त, ८ आरोपींवर गुन्हे
जालना, 27 जून (हिं.स.)। जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत मंठा पोलिसांनी धडक कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला, अवैध देशी दारू जप्त केली तसेच विनापरवाना धारदार तलवार बाळगणाऱ्या आ
जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तलवार व देशी दारू जप्त, ८ आरोपींवर गुन्हे


जालना, 27 जून (हिं.स.)। जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत मंठा पोलिसांनी धडक कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला, अवैध देशी दारू जप्त केली तसेच विनापरवाना धारदार तलवार बाळगणाऱ्या आरोपीवर कारवाई केली. या तिन्ही कारवायांमध्ये एकूण ८ आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तळणी बसस्थानका जवळ देवगाव रोडलगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ६ जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून ४,९२० रुपये रोख, दोन दुचाकी (१.१० लाख रुपये ) आणि ५२ पत्त्यांचा कॅट असा एकूण १,१४,९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, संभाजीनगर परिसरात एका व्यक्तीकडे विनापरवाना धारदार लोखंडी तलवार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून ८०० रुपये किमतीची तलवार जप्त केली. याप्रकरणी गु.र.नं. ३५१/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

तसेच तळणी बसस्थानक परिसरात संशयिताची तपासणी केली असता त्याच्याकडून १८० एमएलच्या भिंगरी संत्रा देशी दारूच्या १४ बाटल्या (किंमत १,४०० रुपये) विनापरवाना आढळून आल्या. याप्रकरणी गु.र.नं. ३४९/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात जुगार, अवैध दारू विक्री, शस्त्र बाळगणे किंवा इतर बेकायदेशीर प्रकारांची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन मंठा पोलिसांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande