
अमरावती, 27 जून (हिं.स.) |अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे अधिकारी व अंमलदार यांना रेकॉर्डवरील एक गुन्हेगार हबीब नगरातील त्याच्या राहत्या घरात मॅफेड्रान (एम.डी.) नावाचा अंमलीपदार्थ बाळगून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीवरून गुन्हेशाखेच्या पथकाने नागपुरी गेट पोलिस ठाणे हद्दीतील हबीब नगर, नं. १ येथे अब्दुल इजाज उर्फ इजाज चन्द्रपूर याच्या राहत्या घरी शुक्रवारी रात्री छापेमारी केली असता घरझडतीमध्ये ५४.२ ग्रॅम मॅफेड्रान आढळले. हा अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ असल्याची कबुली दिल्याने आरोपीला ८ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या मॅफेड्रान ड्रग्ससह ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी