लातूरमध्ये 7 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा नेत्रदानाचा संकल्प
लातूर, 26 जून (हिं.स.) : मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातृभूमी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि लायन्स धर्मदाय नेत्र रुग्णालय यांच्या वतीने नेत्र दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात एकू
नेत्रदान


लातूर, 26 जून (हिं.स.) : मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातृभूमी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि लायन्स धर्मदाय नेत्र रुग्णालय यांच्या वतीने नेत्र दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात एकूण 125 जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून नेत्रदानाचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नेत्रतज्ज्ञ डॉ. सागर समगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड, प्रा. राहुल जाधव, तसेच लायन्स नेत्र रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश मुंढे आणि रोहित बेद्रे उपस्थित होते.

या वेळी डॉ. सागर समगे यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. तर सतीश उस्तुरे यांनी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमात सात विद्यार्थ्यांनी नेत्रदानाचा संकल्प करत आवश्यक फॉर्म भरून दिले. यामध्ये पवार निकिता अंगद, गडीकर प्रतिभा संग्राम, अश्विनी बाबुराव पारसे, नंदिनी गोविंद सोनकांबळे, काळे सलोनी मोहन, मुंडे मयुरी रामराव आणि वाघमारे साक्षी अशोक यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मीरा पाटील यांनी केले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande