
परभणी, 26 जून (हिं.स.) : परभणी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील 3 मुकादम आणि 3 सफाई कामगार अशा एकूण 6 कर्मचाऱ्यांना स्वच्छता निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच लाड-पागे शिफारशीनुसार 10 जणांना सफाई कामगार पदाचे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदोन्नती व नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले.
यावेळी माजी उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, सदस्य बबलू घागरमाळे, माजी सभापती अतुल सरोदे तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पदोन्नती मिळालेल्यांमध्ये मुकादम प्रल्हाद देशमाने, मोहम्मद अब्दुल शादाब, मोहम्मद अब्दुल मुजीब, न्यायरत्न घुगे तसेच सफाई कामगार कुणाल भारसाखळे, सौरभ जोगदंड आणि रुबिना मोहम्मद महेमूद यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे रुबिना मोहम्मद महेमूद या परभणी महानगरपालिका इतिहासात स्वच्छता निरीक्षक पदावर पदोन्नती मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
दरम्यान, लाड-पागे शिफारशीनुसार सिद्धार्थ रावसाहेब जाधव, अजय पिराजी झिंझुर्डे, आनंद दादाराव राक्षे, आकाश दिगंबर जोगदंड, राजेश उत्तम खंदारे, मुंजाभाऊ चिमाजी उबाळे, तुषार बालासाहेब धबाले, राणी भालेराव, मोनिका झोडपे आणि प्रदीप दुधाने यांना सफाई कामगार पदावर नियुक्ती देण्यात आली.
महापौरांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पदोन्नती प्रक्रियेला नियमानुसार मंजुरी देण्यात आली असून, ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमास नगर सचिव विकास रत्नपारखे, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
पदोन्नती व नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे महापौर, आयुक्त तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis