नांदेडमध्ये सामाजिक न्याय दिन उत्साहात
नांदेड, 26 जून (हिं.स.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या
अ


नांदेड, 26 जून (हिं.स.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने समता दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीचे उद्घाटन आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आणि सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंदराव बोंढारकर उपस्थित होते.

समता दिंडीचा मार्ग महात्मा फुले पुतळा, स्नेहनगर ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा असा होता. या दिंडीत विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदारांनी सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषदेचे सीईओ संदीप माळोदे यांनी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली, तर सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी आरक्षण व शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.

यानंतर सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या कार्यक्रमात शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. यावेळी नशा मुक्ती शपथ घेण्यात आली तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना डी.डी. वाटप करण्यात आले.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत सहा लाभार्थ्यांना जमीन वाटप आदेश देण्यात आले. तसेच तीन बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात सामाजिक न्याय, समता आणि बंधुता अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला. बार्टी समता दूतांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी भूषवले, तर प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनुक्रमे संबंधित अधिकाऱ्यांनी केले.

------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande