उन्नत नाशिक अभियानांतर्गत रविवारी 'कपिला नदी महा-स्वच्छता अभियान'
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती नाशिक, 27 जून (हिं.स.)। , उन्नत नाशिक अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, नदी संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रव
उन्नत नाशिक अभियानांतर्गत रविवारी 'कपिला नदी महा-स्वच्छता अभियान'


कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती

नाशिक, 27 जून (हिं.स.)।

, उन्नत नाशिक अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, नदी संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रविवार, २८ जून २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत 'कपिला नदी महा-स्वच्छता अभियान' आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास राज्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची विशेष असणार आहे, अशी माहिती महानगपालिका प्रशासनाने दिली आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी नद्या, जलस्रोत आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून त्याच अनुषंगाने नाशिक महानगरपालिका (NMC) आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण (NTMKA) यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, मनपाचे गटनेते, पदाधिकारी, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

कपिला नदी स्वच्छता अभियानाचे स्थळ

•के. के. वाघ कृषी महाविद्यालय, सरस्वती नगर (प्रभाग क्र. ३) •साई नगर (प्रभाग क्र. ३) •जनार्दन स्वामी मठ (प्रभाग क्र. ३)

*वृक्षारोपण कार्यक्रम*•वेळ : सकाळी ८.३० वाजता •स्थळ : सदाशिव गंगाराम भोरे नाट्यगृहाजवळ, कमल नगर, हिरावाडी

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande