परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघात नावंदर -सईदखान -देशमूख यांच्यात तिरंगी लढत होणार
परभणी, 04 जून (हिं.स.)। परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर विवेक नावंदर शिवसेना शिंदे गटाचे सईद खान व अपक्ष सुशील सुरेशदादा देशमुख यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. परभणी-हिंगोली
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघात नावंदर -सईदखान -देशमूख यांच्यात तिरंगी लढत होणार


परभणी, 04 जून (हिं.स.)।

परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर विवेक नावंदर शिवसेना शिंदे गटाचे सईद खान व अपक्ष सुशील सुरेशदादा देशमुख यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम मुदतीत म्हणजे सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 7 इच्छुकांनी 10 उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

या मतदारसंघातून सुशीलकुमार सुरेशराव देशमुख यांनी दोन, विवेक पांडुरंग नावंदर यांनी शिवसेना उबाठा गटाकडून दोन तर सईद खान शेरगुल खान पठाण यांनी शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या व्यतिरिक्त मेहराज खान शेरगुल खान पठाण, विजय रावसाहेब जामकर, विश्वजित मनोहर बुधवंत व संग्राम जामकर यांनी प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय जामकर संग्राम जामकर या दोघांसह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सावंत हे यासाठी परभणीत दाखल झाले होते दरम्यान या तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघातील निवडणूक कमालीची चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande