इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये करिश्मा कपूरने दिला ‘हुस्न है सुहाना’च्या आठवणींना उजाळा
मुंबई, 04 जून (हिं.स.)। इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5 चा प्रीमियर सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर इंडिया वाला डान्स या थीमसह सुरू होत असून प्रेक्षकांना नॉस्टॅल्जियाची खास मेजवानी मिळणार आहे. बॉलीवूड आयकॉन करिश्मा कपूरने आपल्या आयकॉनिक गाण्याच्या “गोरिय
करिश्मा कपूरने ‘हुस्न है सुहाना’च्या आठवणींना दिला उजाळा


मुंबई, 04 जून (हिं.स.)। इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5 चा प्रीमियर सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर इंडिया वाला डान्स या थीमसह सुरू होत असून प्रेक्षकांना नॉस्टॅल्जियाची खास मेजवानी मिळणार आहे. बॉलीवूड आयकॉन करिश्मा कपूरने आपल्या आयकॉनिक गाण्याच्या “गोरिया चुरा ना मेरा जिया” कुली नं. 1 मधील आठवणींना उजाळा दिला, ज्यातून देशी डान्सचा रंगतदार उत्सव साकारला गेला.

स्पर्धक अंशिका धाराच्या एनर्जेटिक परफॉर्मन्सनंतर करिश्मा कपूरने तिच्या अॅक्टचे भरभरून कौतुक केले. परफॉर्मन्सची ऑथेंटिसिटी आणि त्यातील आधुनिक टच दोन्हींचं तिने कौतुक केलं. आपले विचार शेअर करत करिश्मा म्हणाल्या, “तुम्ही गाण्याचा फ्लेवर आणि एस्सेन्स कायम ठेवला आणि त्यात एक मॉडर्न ट्विस्टही दिला. मला खूप मजा आली. हे ‘गोरिया चुरा ना मेरा जिया’चं अपडेटेड व्हर्जन होतं, जे मला खूपच छान वाटलं. ग्रेट कोरिओग्राफी, ग्रेट परफॉर्मन्स. खूप मेहनत केली आहे तुम्ही आणि ती स्पष्ट दिसते आहे. तुम्हाला आणि रुपेशला वेल डन. मी खूप एन्जॉय केलं.”

करिश्माने या गाण्याशी जोडलेल्या स्वतःच्या आठवणींवरही प्रकाश टाकला आणि गोविंदा यांच्यासोबत हे गाणं शूट करताना ती किती तरुण आणि नर्व्हस होती हे सांगितले. करिश्मा म्हणाल्या, “तुम्ही फक्त 16 वर्षांच्या आहात आणि मी त्या वेळी 17-18 वर्षांची होते. मला गोविंदा जींसोबत डान्स करायचा होता. मला आठवतं की हे माझं पहिलं किंवा दुसरं डान्स नंबर होतं ची-चीसोबत. मी खूप नर्व्हस होते आणि गणेश आचार्यसोबतही हे माझं पहिलं गाणं होतं, त्यामुळे तोही एक नवा कॉम्बिनेशन होता.”

सेटवरील वातावरण आठवत करिश्मा पुढे म्हणाल्या, “मला आठवतं डेव्हिड धवन माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘तुला माहिती आहे, हे खूप चांगले कोरिओग्राफर आहेत, हे नवे गणेश मास्टर आहेत.’ तेही खूप शाय वाटत होते आणि मीही खूप शाय होते. मग त्यांना समजवावं लागलं आणि मला सांगावं लागलं की बघ, तू गोविंदा जींसोबत डान्स करत आहेस आणि हे एक आयटम साँग आहे.”

शेवटी करिश्माने या आयकॉनिक गाण्याच्या निर्मितीत झालेल्या मेहनतीची आठवण करून दिली आणि सांगितले की अशा कालातीत प्रयत्नांमुळे आजही नवीन टॅलेंटला प्रेरणा मिळते.

हा एपिसोड प्रेक्षकांना शानदार परफॉर्मन्सेस, नॉस्टॅल्जिक बॉलीवूड आठवणी आणि भावस्पर्शी क्षणांची मेजवानी देणार आहे. नृत्याचा उत्सव तर आहेच, पण त्यासोबतच खास आठवणी, भावनिक क्षण आणि बॉलीवूडच्या सुवर्णकाळातील अनकथित गोष्टीही प्रेक्षकांना पूर्णपणे एंटरटेन करतील.

इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5, 6 जूनपासून सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर आणि सोनी लिव्ह वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande