
मुंबई , 27 जुलै (हिं.स.)।कुकिंगसोबत विनोदाची भन्नाट मेजवानी देणाऱ्या ‘लाफ्टर शेफ्स: अनलिमिटेड एंटरटेनमेंट सीझन 3’ या लोकप्रिय शोचे विजेतेपद जन्नत जुबैर आणि अली गोनी यांच्या जोडीने पटकावले आहे. रविवारी, २६ जुलै रोजी या शोचा भव्य ग्रँड फिनाले पार पडला. अनेक आठवडे चाललेल्या कुकिंग चॅलेंजेस, धमाल-मस्ती आणि उत्कृष्ट टीमवर्कच्या जोरावर जन्नत आणि अली यांनी सीझन 3 ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.
ग्रँड फिनालेमध्ये जन्नत आणि अली यांनी करण कुंद्रा आणि एल्विश यादव या मजबूत प्रतिस्पर्धी जोडीचा पराभव केला. करण आणि एल्विश हे देखील संपूर्ण हंगामात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या स्पर्धकांपैकी होते. रविवारी झालेल्या या ग्रँड फिनालेमध्ये ‘खतरों के खिलाड़ी 15’ या आगामी शोची टीमही सहभागी झाली होती. यावेळी शोचे होस्ट रोहित शेट्टी यांनीही विशेष उपस्थिती लावली. ‘लाफ्टर शेफ्स 3’ संपल्यानंतर आता ‘खतरों के खिलाड़ी 15’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘लाफ्टर शेफ्स सीझन 3’ हा शो जिंकल्याबद्दल जन्नत जुबेरने आनंद व्यक्त केला आहे. तिने म्हटले कि,“लाफ्टर शेफ्स हा अशा वेगळ्या शोमध्ये मोडतो, जिथे फक्त एक विजेता किंवा एक विजयी टीम नसते. जरी मी आणि अलीने ट्रॉफी जिंकली असली, तरी या शोशी जोडलेला प्रत्येक जण विजेता आहे, असे मला मनापासून वाटते. आम्ही एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा केला, एकत्र हसलो आणि एकत्र प्रगती केली. हीच एकत्र काम करण्याची भावना हा प्रवास इतका खास बनवते.”
दरम्यान, ‘लाफ्टर शेफ्स’च्या दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद एल्विश यादव आणि करण कुंद्रा यांच्या जोडीने जिंकले होते.
या शोचे सूत्रसंचालन भारती सिंह करतात, तर प्रसिद्ध शेफ हरपाल सिंह सोखी हे परीक्षक (जज) म्हणून जबाबदारी सांभाळतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode