विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी व शहरातील नगरसेवक यांचे करीता प्रशिक्षणाचे आयोजन.
अकोला, 01 जुलै (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने 31-अकोला पूर्व मतदारसंघ अंतर्गत विशेष सखोल पुर्नरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित कार्यक्रमानुसार सुरु क
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी व शहरातील नगरसेवक यांचे करीता प्रशिक्षणाचे आयोजन.


अकोला, 01 जुलै (हिं.स.)।

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने 31-अकोला पूर्व मतदारसंघ अंतर्गत विशेष सखोल पुर्नरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित कार्यक्रमानुसार सुरु करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांची राजकीय पक्षांकडून नेमणूक करणे आवश्यक आहे. काही पक्षांकडून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांची नेमणुक केली असून अद्याप काही राजकीय पक्षांनी नेमणूक करणे बाकी आहे.

तरी अकोला पूर्व अंतर्गत नियुक्त मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी तसेच अकोला महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवक यांचेकरीता विशेष सखोल पुर्नरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी बाबत प्रशिक्षण दि. 2 जुलै 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता छत्रपती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित करण्यात येत आहे.

तरी अकोला महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी सदर प्रशिक्षणाकरीता उपस्थित राहाण्याबाबत अकोला महानगरपालिका सचिव यांनी विनंती केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande