
नाशिक, 01 जुलै (हिं.स.): जीएसटी स्थापना दिनानिमित्त सीजीएसटी नाशिक आयुक्तालय, सीजीएसटी लेखापरीक्षण आयुक्तालय आणि सीजीएसटी अपील आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवून उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .
यानिमित्त सकाळी सिडको येथील सीजीएसटी भवन येथून गोल्फ क्लबपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जीएसटी जनजागृतीचा संदेश देण्यासाठी ही रॅली नाशिक सायकलिस्ट असोसिएशन आणि सर्व जीएसटी विभागातील अधिकारी यांच्या सहकार्याने घेण्यात आली. या वेळी आयुक्त हेमलता राय आणि आयुक्त (अपील) राकेश लाडवाल यांच्या उपस्थितीत सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली . जिसटी संदर्भात जनजागृती चे फलक घेऊन रॅलीचा समारोप परत जिसएटी भवन येथे करण्यात आला .
तसेच अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा , अधिकाऱ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . याशिवाय, नाशिकमधील नामांकित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी — फ्रॅवशी इंटरनॅशनल, कॅम्ब्रिज स्कूल, केंद्रीय विद्यालय (देवळाली, नाशिक रोड आणि नेहरू नगर) जीएसटी जनजागृती, विभागीय कार्यप्रणाली आणि जीएसटीमधील करियर संधी यावर संवादात्मक सत्र घेण्यात आले.
दुपारी ३ वाजता व्यापार सुलभता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात शीर्ष १० करदात्यांचा गौरव, अधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्रे प्रदान करणे तसेच प्रश्नमंजुषा आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी न्यायिक सदस्य रमेश नायर, जीएसटीएटी आयुक्त हेमलता राय, आयुक्त (अपील) राकेश लाडवाल, आयुक्त एस.बी. देशमुख आणि निमा अध्यक्ष आशिष नाहर उपस्थित होते. सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जीएसटी दिनानिमित्त सहायक आयुक्त (प्रतिबंध) पी.के.जे. अय्यर यांनी लिहिलेला, संगीतबद्ध केलेला, दिग्दर्शित आणि गायलेला जीएसटी गीताला सीबीआयसी मंडळाकडून राष्ट्रीय मान्यता प्राप्त झाल्याने उत्सवात अजून भर पडली .
जीएसटी दिन यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त अजित दान , डि रणजित कुमार , अनुश्री हार्डिकर, संयुक्त आयुक्त श्री शंतनू तसेच सहायक आयुक्त पी.के.जे. अय्यर, शिवाजी सुरळकर , तुषार दोभाळ , अंजुम तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली
एम.ए. खान, राहुल खेडकर, अमोल सैतवाल, पी.टी. गायधनी, संजय सोनवणे अधीक्षक आणि मुख्य लेखा अधिकारी विद्या वाघमारे यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. यावेळी उत्सवात विभागांतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचीही उपस्थिती लाभली होती .
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV