स्मार्ट सिटीच्या कामावरून हिमगौरी आहेरानी भाजपाच्या अडचणी वाढविल्या
Himgauri Aherani increases BJP's problems over Smart City work
Himgauri Aherani increases


चुका करणारे स्मार्ट सिटी चे अधिकारी मात्र मोकळेच

नाशिक, 01 जुलै (हिं.स.)।

- नासिक मध्ये स्मार्ट सिटीच्या कामांना होत असलेल्या विरोधाकडे दुर्लक्ष करून भाजपाच्या दोन माजी महापौरांनी दिलेल्या मंजुरीचा प्रश्न विद्यमान महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी भांडाफोड केलेला आहे यामुळे भाजपाचे दोन माजी महापौर अडचणीत आलेले असून महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी देखील माजी आयुक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यामुळे त्यांनी देखील प्रत्यक्षात ही भूमिका समजून न घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये नाशिक शहराचा समावेश करण्यात आला परंतु प्रशासनाची चुकीची भूमिका आणि लोकप्रतिनिधींवरती टाकलेले जाळे त्यातून लोकप्रतिनिधींनी आपली सुटका करण्यापेक्षा स्वतः कसे गुंतत गेले याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकचा स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. नाशिक शहरामध्ये अशोक स्तंभ ते त्रंबक नाका हा रस्ता बनवत असताना ज्या पद्धतीने काम झाले ते पहिल्यापासूनच चुकीचे होते अनेकांनी विरोध केला परंतु त्या वेळचे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थवील मोठ्या प्रमाणावर ती हा विरोध म्हणून पडला आम्ही म्हणू तेच खरे आम्ही सांगतो तेच खरे असे सांगून हे सगळे प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. या प्रकल्पाला त्या वेळचे नगरसेवक आणि आत्ताचे ही नगरसेवक असलेले गुरमीत बग्गा, शाहु खैरे, यांच्या सह काही नगरसेवकांनी वेळोवेळी विरोध केला परंतु हा विरोध चुकीचा आहे असे दाखविण्याचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केले त्या वेळच्या आयुक्तांनाही त्यांनी दबावांमध्ये गुंडाळून ठेवले आणि आम्ही करू तसेच योग्य आहे आणि त्याला तुम्ही मम म्हणा अशा पद्धतीप्रमाणे केलेले कार्य हे नाशिककरांच्या अक्षरशः जीवावर उठलेले आहेत.

कारण नसताना केलेले काम चुकीच्या पद्धतीप्रमाणे आणि नियोजन शुन्य सुरू असलेला कारभार यामुळे आज नाशिक शहरात अशोक स्तंभचे त्रंबक नाका या रस्त्यापर्यंत येण्यासाठी देखील नाकात दम येतो अशा स्वरूपाचे रस्ते आहेत पार्किंगचा पूर्णपणे भोजारा उडालेला आहे जिल्हाधिकारी कार्यालय तर पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जाते यासारखेच बघायचं झालं तर शहरातील काही आस्थापना या देखील अशाच पद्धतीप्रमाणे पाण्यात बुडतात त्यावेळी विरोध करण्यात आला परंतु हा विरोध चुकीचा आहे हे दाखविण्याचा कामच स्मार्ट सिटी चे अधिकारी असलेल्या सुमंत मोरे आणि प्रकाश थवील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी केले.

नाशिक महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांचा पंचनामा झाला तो बघितला तर शहरातील कामांची काय प्रगती आहे कशा पद्धतीप्रमाणे शहराचा विकास होत आहे हे देखील स्पष्ट होत आहे. हे सर्व स्पष्ट करत असताना विद्यमान महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी आपल्याच भाजपाच्या दोन माजी महापौरांचा भांडाफोड केलेला आहे . या माजी महापौरांनी चुकीच्या पद्धतीप्रमाणे कामकाज केले असे अप्रत्यक्षरीत्या विद्यमान महापौर हिमगौरी आहेर अडके यांनी महासभेमध्ये मान्य केले तर हे कमी होते की काय प्रशासनाचे प्रमुख आणि स्मार्ट सिटी चे अध्यक्ष असलेले मनीषा खत्री या आयुक्तांनी यापूर्वीच्या आयुक्तांची भूमिका चुकीची असल्याचे सांगून त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले पण तत्कालीन एक दोन आयुक्त जर सोडले तर इतर आयुक्तांनी देखील स्मार्ट सिटीच्या कामाला विरोध केला पण स्मार्ट सिटीच्या हुशार अधिकाऱ्यांनी हा विरोध देखील आणून पडला वेळप्रसंगी काही मंत्र्यांची मदत घेतली तर काही वेळा मंत्रालयातील अधिकाऱ्यांचाही उपयोग करून घेतला हे सर्वश्रुत असताना कोणताही अभ्यास नाही अशा स्वरूपाचं वक्तव्य महासभेत करून महापौरांनी आपल्याच पक्षातील माजी महापौरांना तसेच आपण सभागृहाचे सदस्य आहोत आणि यापूर्वी ज्या सभागृहाने स्मार्ट सिटीची काम मंजूर केली त्या सभागृहाचे देखील आपण सदस्य होतो याचे कोणतेही भान न ठेवता सर्वांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून महापौरांनी पक्षाला चांगलेच अडचणी चांगले आहे.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande