

पुणे, 14 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त निघणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे (पुणे जिल्हा, पुरंदर तालुका) येथे अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले. वाल्हेकर ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक मोठ्या उत्साहाने फुलांची उधळण पालखीचे स्वागत केले. या पालखी सोहळ्याचा मुक्काम वाल्हे येथील पालखीतळावर होतो. वाल्हे मुक्कामानंतर दुसर्या दिवशी सकाळी पालखी सोहळा नीरा नदी स्नानासाठी मार्गस्थ होतो आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे पुढील मुक्कामासाठी जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule