कोपरखैरणेत इमारतीचा स्लॅब कोसळला; रहिवाशांचे स्थलांतर
नवी मुंबई, 15 जुलै (हिं.स.)। नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 18 येथील प्लॉट क्रमांक 14 वरील अर्थव सोसायटीमध्ये आज सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक 302 चा स्लॅब कोसळून तो थेट दुसऱ्या
कोपरखैरणेत इमारतीचा स्लॅब कोसळला; रहिवाशांचे स्थलांतर


नवी मुंबई, 15 जुलै (हिं.स.)। नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 18 येथील प्लॉट क्रमांक 14 वरील अर्थव सोसायटीमध्ये आज सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक 302 चा स्लॅब कोसळून तो थेट दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक 202 मध्ये पडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

रहिवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोपरखैरणे विभाग कार्यालयाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. प्रभावित इमारतीतील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यासाठी सेक्टर 5 येथील अण्णासाहेब पाटील सभागृहात तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय, कोणताही पुढील धोका टाळण्यासाठी इमारतीचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. संपूर्ण इमारत सील करण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांकडून इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेची तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande