
- लाभार्थ्यांना मिळाले हक्काचे पट्टे - आ प्रतापदादा अडसड यांनी राबविला पहिला उपक्रम
अमरावती, 16 जुलै (हिं.स.)।
समाजातील शेवटच्या घटकातील ग्रामस्थांना हक्काचे घरकुल मिळावे, जमिनीचे मालकी हक्क देऊन त्यांना कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य शासनाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्याच्या निर्णयाची सर्वात प्रथम अंमलबजावणी अमरावती महसूल विभागात अंजनसिंगी या गावात आमदार प्रतापदादा अडसड यांच्या पुढाकाराने झाली असून आठ लाभार्थ्यांना हे जमिनीचे पट्टे देण्यात आले.
गावागावात पिढ्यानपिढ्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण अनेक कुटुंब राहतात मात्र अशा ठिकाणी त्यांना शासकीय घरकुलांचा लाभ मिळत नव्हता त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २५ मार्च २०२६ रोजी शासकीय अध्यादेश काढून शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमकुल करण्याला मान्यता दिली.
तालुक्यातील अंजनसिंगी या गावात मागील सोळा वर्षा पासून १४० कुटुंब शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहत होते त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नव्हता राज्य शासनाच्या नव्या आदेशा प्रमाणे त्यांना आज आ. प्रतापदादा अडसड यांच्या उपस्थितीत घरकुलाचे पट्टे देण्यात आले यावेळी तहसिलदार अभय घोरपडे, बीडीओ प्रफुल भोरखडे, येथील प्रशासक शाया गायकवाड,माजी उपसरपंच अवधूत दिवे भाजपा तालुकाध्यक्ष प्रणय राजनकर भोजराज हिवसे,सुरेश कासमकर ,प्रभाकर काळे,प्रभाकर वाघे,अशोक वानखडे ,ऋषिकेश मुंडेकर, गजानन पुणसे, विजय कांडलकर यांची उपस्थिती होती
तालुक्यातील सर्व गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून रहिवासी असलेल्या ग्रामस्थांची नावे घेण्यात आली आहे आज पहिला टप्प्यात अंजनसींगी येथील लाभार्थ्यांना हे पट्टे वाटप करण्यात आले ८५० लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमानुकुल ३१ डिसेंबर पर्यंत करण्यात येऊन त्यांना घरकुले देण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी