पादुका सोहळा अपहारप्रकरणी किशोर जाधव यांच्या पोलीस कोठडीत 18 जुलैपर्यंत वाढ
लातूर, 16 जुलै (हिं.स.) : खंडापूर शिवारात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान संतांच्या पादुका सोहळ्यात झालेल्या कथित कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी किशोर जाधव (शिवणीकर महाराज) याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुन
किशोर महाराज


लातूर, 16 जुलै (हिं.स.) : खंडापूर शिवारात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान संतांच्या पादुका सोहळ्यात झालेल्या कथित कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी किशोर जाधव (शिवणीकर महाराज) याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत 18 जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत असून तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. कथित आर्थिक व्यवहार, संबंधित कागदपत्रे, पुरावे आणि इतर बाबींची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संतांच्या पादुका सोहळ्याशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande