
बीड, 16 जुलै (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार-2026' प्रदान करण्यात आला.
अकोला येथील संकल्प बहुउद्देशीय संस्था आणि तुलंगा येथील ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथील द्वारका लॉन्समध्ये आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते नितीन सोनवणे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis