यवतमाळमध्ये बोगस बियाणे कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा
- शेतकऱ्यांना हमी देणे भोवले यवतमाळ 16 जुलै (हिं.स.) खरीप हंगामात शेतकर्!यांची फसवणूक करणार्!या निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणे प्रकरणात रात्री प्रशासनाने मोठी कारवाई केली. शेतकर्!यांना हमी देत निकृष्ट आणि अप्रमाणित सोयाबीन बियाण्यांची विक्र
बोगस बियाणे कंपनीविरोधात फौजदारी शेतकर्!यांना हमी देणे भोवले; बाभूळगाव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा


- शेतकऱ्यांना हमी देणे भोवले

यवतमाळ 16 जुलै (हिं.स.)

खरीप हंगामात शेतकर्!यांची फसवणूक करणार्!या निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणे प्रकरणात रात्री प्रशासनाने मोठी कारवाई केली. शेतकर्!यांना हमी देत निकृष्ट आणि अप्रमाणित सोयाबीन बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी ‘बूस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमीटेड’ (गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना) या कंपनीविरुद्ध बाभूळगाव पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील गेवराई बाजार येथील ‘बूस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने सोयाबीनचे बियाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री केले. या बियाण्यांच्या पाकिटवर ‘बेस्ट व्कॉलीटी गॅरेंटेड १०० टक्के सॅटिफीकेशन’, असा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. या दाव्यानुसार जिल्ह्यातील शेतकर्!यांनी बियाणे खरेदी करून लागवड केली. आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा दिले. परंतु पेरणीनंतर बियाण्यांची उगवण झाली नाही. या प्रकारामुळे शेतकर्!यांची चिंता वाढली होती. शेवटी संतप्त शेतकर्!यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रार दाखल केल्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत कृषी विभागाने संबंधित बियाण्यांचे नमुने घेऊन नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. प्रयोगशाळेच्या अहवालात हे बियाणे ’अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. तसेच बियाण्यांचे उत्पादन, पॅकिंग आणि सीलिंग यासाठी आवश्यक शासकीय प्रमाणीकरण न घेता ते प्रमाणित असल्याचा भास निर्माण करून शेतकर्!यांची दिशाभूल करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून बाभूळगाव पंचायत समितीचे बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी दत्तात्रय विठ्ठलराव तमलवाड यांनी मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘बूस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकर्!यांनी या कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रोहित गंगाधर बेम्ब्रे करीत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, इतर कंपन्यांविरुद्ध कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

४८५ ठिकाणी स्पॉट तपासणी

जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीन बियाणे उगवणीच्या एकूण ८३२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नेर, बाभूळगाव आणि दारव्हा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक तक्रारी आहेत. यात ४१५ नेर, १५६ बाभूळगाव, १३६ दारव्हा, ५० कळंब, १९ वणी, १३ यवतमाळ, ११ पुसद, नऊ आर्णी, घाटंजी, मारेगाव प्रत्येकी पाच, दिग्रस, पांढरकवडा प्रत्येकी चार, उमरखेड तीन, महागावमध्ये दोन तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. त्यापैकी तालुका तक्रार निवारण समितीने ४८५ तक्रारींची पाहणी केली. तर ३०२ तक्रारीची पाहणी करण्यात येणार आहे.

----------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande