यवतमाळ - अवैध सावकारी प्रकरणात चार ठिकाणी छापे, ५४ आक्षेपार्ह कागदपत्रांसह मोबाईल जप्त
यवतमाळ, 16 जुलै (हिं.स.) अवैध सावकारी व्यवहारांविरोधात बुधवारी (ता. १५) जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाने रात्री उशिरा पर्यंत मोठी धडक कारवाई केली. शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी एकावेळी झाडाझडती घेतली. या कारवाईत एकूण ५४ आक्षेपार्ह कागदपत्रे, धनादेश,
यवतमाळ - अवैध सावकारी प्रकरणात चार ठिकाणी छापे, ५४ आक्षेपार्ह कागदपत्रांसह मोबाईल जप्त


यवतमाळ, 16 जुलै (हिं.स.)

अवैध सावकारी व्यवहारांविरोधात बुधवारी (ता. १५) जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाने रात्री उशिरा पर्यंत मोठी धडक कारवाई केली. शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी एकावेळी झाडाझडती घेतली. या कारवाईत एकूण ५४ आक्षेपार्ह कागदपत्रे, धनादेश, स्टॅम्पपेपर, दस्तऐवज, डायर्!या, चिठ्ठ्या तसेच एक मोबाईल जप्त केला. या प्रकरणात संतोष अजबराव कदम (रा. गौळ बाजार, कळमनुरी, हिंगोली), समाधान वामनराव पाटील (रा. बंजारा कॉलनी, पुसद), प्रकाश शंकरराव चोरमले (रा. ईसापूर, ता. पुसद) व दिलीप सखाराम उत्तरवार (रा. ग्रीन पार्क-१, पुसद) यांचे घर आणि संबंधित ठिकाणी झडती घेण्यात आली. जिल्हा निबंधक कार्यालयाकडे माधव गव्हाणे (रा. ओमनगर, श्रीरामपूर ) व सुभाष दुलबा डवले (रा. ग्रीन पार्क-२, श्रीरामपूर ) यांनी केलेल्या अवैध सावकारी व्यवहारांच्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. झडती दरम्यान संतोष अजबराव कदम यांच्या ठिकाणाहून १९ आक्षेपार्ह कागदपत्रे, समाधान वामनराव पाटील यांच्या निवासस्थानातून नऊ कागदपत्रे, तर दिलीप सखाराम उत्तरवार यांच्या घरातून २६ आक्षेपार्ह कागदपत्रे व एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. प्रकाश शंकरराव चोरमले यांच्या घरात मात्र कोणतेही आक्षेपार्ह साहित्य आढळून आले नसल्याने त्याठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात आली नाही. जप्त करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील तरतुदीनुसार संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

-----------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande