सेवाभाव, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हीच खरी लोकसेवा - महापौर राजूरकर
छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर यांच्या वतीने कर्करोग रुग्णांच्या सेवेसाठी एक छोटासा हातभार लावण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील कर्करोग रुग्णालयात रुग्णांसाठी मोफत औषधांचे वितरण करण्यात आल
अ


छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर यांच्या वतीने कर्करोग रुग्णांच्या सेवेसाठी एक छोटासा हातभार लावण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील कर्करोग रुग्णालयात रुग्णांसाठी मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.

मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील हजारो कर्करोग रुग्ण उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे येतात. अशा रुग्णांच्या उपचारप्रवासात समाजानेही संवेदनशीलतेने सहभागी होणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे महापौर राजूरकर यांनी सांगितले

याच भावनेतून कर्करोग रुग्णांसाठी हा छोटासा सेवाभावाचा उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांसमवेत रुग्णांशी संवाद साधत, समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने अशा रुग्णांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले. सेवाभाव, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हीच खरी लोकसेवा, असेही ते म्हणाले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande