लातूर - वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी विविध मंदिरांत जलाभिषेक करत भाविकांना महाप्रसादाचे वाटप
लातूर, 23 जुलै (हिं.स.) पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही वरुणराजाने पाठ फिरवल्याने शेतकरी आणि व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरड्या पडलेल्या शिवारात पावसाच्या प्रत्येक थेंबाची आस लागलेल्या बळीराजाच्या सुखासाठी चाकूर शहरातील व्यापार
प्रतिक्षा पावसाची


लातूर, 23 जुलै (हिं.स.) पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही वरुणराजाने पाठ फिरवल्याने शेतकरी आणि व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरड्या पडलेल्या शिवारात पावसाच्या प्रत्येक थेंबाची आस लागलेल्या बळीराजाच्या सुखासाठी चाकूर शहरातील व्यापारी बांधव एकत्र आले आणि पाऊस पडू दे, शेती बहरू दे अशी मनोभावे प्रार्थना करत त्यांनी श्री मारुतीच्या चरणी साकडे घातले.

व्यापारी बांधवांनी अनवाणी पायाने शहरातील विविध देवस्थानांना भेट देत दैवतांच्या मूर्तीवर जलाभिषेक केला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओमप्रकाश लोया, बबलू फुलारी, कार्तिक सूर्यवंशी, साईप्रसाद हिप्पाळे, अशोक बेजगमवार, अतिष चिटबोने, सुमित होनकर, गणेश घाटे, सागर बेजगमवार, सुरज सोनटक्के, गुणवंत जानकर, हणमंत शेळके,

गणेश मद्रेवार, नंदकुमार हाळे, विश्वप्रताप सूर्यवंशी, कौस्तुभसुवर्णकार, लक्ष्मण भातके, संजय कस्तुरे, गोविंदलाल लोया, शैलेश पाटील, धनाजी धोंडगे, साईनाथ मद्रेवार, मुकुंद बेजगमवार, कल्याण वाघमारे, राजीव डिगोळे, नरसिंग धोंगडे, अभय सुवर्णकार, अभिजित व्होटे आदींनी सहभाग नोंदविला

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande