
बीड, 23 जुलै, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील चुंबळी गावातील ग्रामस्थांनी पाटोदा पंचायत समिती कार्यालयासमोर बँड वाजवत अनोखे आंदोलन केले. गावातील समाज मंदिराच्या निकृष्ट बांधकामासह दलित वस्तीतील विकासकामांमध्ये अनियमितता, कामे न करता बिले काढणे आणि काही बिलांची दुबार नोंद झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. प्रशासनाने निवेदन स्वीकारून चौकशीचे आश्वासन दिले असून, लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis