
लातूर, 23 जुलै (हिं.स.)। जंतर मंतर येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लातूर बंदची हाक देण्यात आली. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते आंबेडकर पार्क दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis