अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात २४ जुलैला पिंपरी-चिंचवडमध्ये महामोर्चा
पुणे, 23 जुलै, (हिं.स.)। अनुसूचित जातीच्या घटनात्मक आरक्षणाचे प्रस्तावित उपवर्गीकरण हे समाजात फूट पाडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत, त्याला अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींचा तीव्र विरोध असल्याचे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी
Mansb


पुणे, 23 जुलै, (हिं.स.)। अनुसूचित जातीच्या घटनात्मक आरक्षणाचे प्रस्तावित उपवर्गीकरण हे समाजात फूट पाडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत, त्याला अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींचा तीव्र विरोध असल्याचे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने म्हटले आहे. प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २४ जुलै) पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे यांनी सांगितले की, सकाळी १०.३० वाजता भक्ती-शक्ती चौक येथून निगडीतील अप्पर तहसील कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर, आरपीआयचे महासचिव अविनाश महातेकर तसेच माजी मंत्री बबनराव घोलप यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय संविधान, सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ आली असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande