
छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै (हिं.स.)। ३७ भूकंपग्रस्त गावांच्या नूतनीकरण व मूलभूत सुविधेसाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे अशी मागणी आमदार प्रवीण स्वामी यांनी केली आहे एका कार्यक्रमात त्यांनी यासंदर्भात उहापोह केला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष गावात देण्यात आला आहे. अशी माहिती आमदार प्रवीण स्वामी यांनी दिली.
३७ भूकंपग्रस्त गावांच्या नूतनीकरण व मूलभूत सुविधेसाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे.निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्यांच्या नूतनीकरणाची गरज आहे.या भागात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून हा भाग समृद्ध झाला पाहिजे.उमरगा येथे १०० खाटांच्या महिला रुग्णालयाची आवश्यकता आहे.त्यामुळे शेजारच्या कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील रुग्णांना देखील या रुग्णालयाचा लाभ होणार असल्यामुळे या रुग्णालय उभारणीला शासनाने मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा. अतिक्रमणे नियमाकुल करणे व पाणंद रस्त्याची कामे वेळेत झाली पाहिजे.येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis