लातूर - मंत्री संजय राठोड यांची गोर बंजारा कवी संमेलनास उपस्थिती
लातूर, 26 जुलै (हिं.स.)। लातूर येथे वसंत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गोर बंजारा कवी संमेलनात मंत्री संजय राठोड यांनी उपस्थित राहून समाजातील प्रतिभावंत कवींच्या कवितांचा आस्वाद घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बंजारा साहित्य, कला आणि
संजय राठोड


लातूर, 26 जुलै (हिं.स.)।

लातूर येथे वसंत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गोर बंजारा कवी संमेलनात मंत्री संजय राठोड यांनी उपस्थित राहून समाजातील प्रतिभावंत कवींच्या कवितांचा आस्वाद घेतला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बंजारा साहित्य, कला आणि संस्कृतीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अशा उपक्रमांमधून आपली समृद्ध संस्कृती तरुण पिढीपर्यंत पोहोचते, त्यामुळे असे उपक्रम सातत्याने होत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच शिक्षण ही वर्तमान आणि भविष्यात समाजाची सर्वात मोठी ताकद असल्याचे नमूद करत, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, विज्ञान, प्रशासन आणि उद्योग क्षेत्रात बंजारा समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष बापुराव राठोड, आश्रमशाळा संस्थाचालक संघांचे अध्यक्ष शेषराव चव्हाण, प्रा. शंकर चव्हाण, प्रा. अरुण पवार, प्रा. डॉ. विनायक पवार, प्रा. डॉ. वीरा राठोड, प्रा. डॉ. शंकर राठोड, मा. सुरेश राठोड व वसंत सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच समाज बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande